वर्धा, जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील एकूण 1 हजार 342 मतदान
केंद्रांवरून बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान केंद्रावर 1 हजार 342
मतदान केंद्राध्यक्ष, 4 हजार 26 मतदान अधिकारी तर 268 मतदान केंद्राध्यक्ष
(राखीव), 805 मतदान अधिकारी (राखीव) व 150 क्षेत्रिय अधिकारी (राखीव) असे
एकूण 6 हजार 591 अधिकारी-कर्मचा-यांनी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी
यासाठी सेवा दिली. तर निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न
निर्माण होणार नाही यासाठी पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक
सागर कवडे यांच्यासह सहा उपविभागीय अधिकारी, 18 पोलिस निरिक्षक, 101
सहाय्यक पोलिस निरिक्षक/पोलिस उपनिरिक्षक असे एकूण 127 अधिकारी, 118
पोलिस अंमलदार, 1 हजार 159 गृहरक्षक दलाचे जवान तर जिल्ह्याबाहेरील 500
पोलिस अंमलदार, 1 हजार 150 गृहरक्षक तसेच सी.ए.पी.एफ व एस.ए.पी.एफ.च्या
15 प्लॉटूनच्या जवानांनी खडा पहारा दिला.
फोटो-20-w-22
बॉक्स
स्वयंसेवकांनी दिली सेवा
दिव्यांग व वयोवृद्धांना मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी सहकार्य व्हावे
यासाठी जिल्ह्यातील 1 हजार 342 केंद्रांवर स्वयंसेवकांनी सेवा दिली. इतकेच नव्हे
तर प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार तसेच शांततेत मतदान पार पाडणा-या
अधिकारी व कर्मचा-यांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वच्छतागृह आदी प्राथमिक
सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील प्रत्येक मतदान
केंद्रावर गरोदर व स्तनदा माता तसेच जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना इतर
मतदारांच्या रांगेत उभे न करता त्यांना मतदानासाठी प्राधान्य देण्यात आले.