जिल्हा बातम्याराजकीयराज्य

जिल्ह्यातील चारही विधानसभेवर भाजपचा विजयी पताका

वर्धा : वर्धा जिल्हा हा काँग्रेस चा बालेकिल्ला समजल्या जात होता, मात्र जिल्ह्यात चारही विधानसभेच्या जागेवर भाजपाने विजयी पताका रोवल्याने जिल्हाकाँग्रेस मुक्त करून भाजपमय करण्याचा निर्धार अखेर यशस्वी झाला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निकाला तुन दिसून आले. देवळीत सलग पाच वेळा विजयी होणारे काँग्रेसचे रणजित कांबळे यांना प्रथमच पराभव चाखावा लागला.गत विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकवर राहिलेले भाजपचे राजेश बकाने यांनी यावेळी दमदार मते घेत कांबळे यांना धूळ चारली.

कांबळे यांची डबल हॅटट्रिक मोडीत काढीत बकाने यांनी कमळ फुलवून देवळीत-पुलगाव विधानसभा क्षेत्रात इतिहास रचला. या मतदारसंघात प्रथमच भाजपने पाय रोवले आहे. आर्वीत भाजपचे सुमित वानखेडे यांना नवीन चेहऱ्याला पसंती दिली.विद्यमान खासदार अमर काळे यांच्या पत्नी मयुरा काळे यांचा 39729 मतांनी दारुण पराभव स्विकारावा लागला.प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दादाराव केचे यांनी विरोधात काम केल्याची अफ़वा उडाली, पण त्याने फरक पडला नसल्याचे आज निकालातून स्पष्ट झाले.
हिंगणघाट येथे भाजपचे समीर कुणावार यांनी 30878 अधिक मते घेत हॅटट्रिक साधली. या मतदारसंघात आमदारकीची हॅटट्रिक मारणारे ते पहिले विजयी वीर ठरले आहे. त्यांच्या विरोधात असलेले शरद पवार राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांना लढत देताना दमछाक झाल्याचे मत मोजणीतून दिसून आले. वर्ध्यात भाजपची सुरवातीस धाकधूक उडाली होती.  काँग्रेसचे उमेदवार शेखर शेंडे यांनी पहिल्या ते चौदा व्या फेरी पर्यंत आघाडी ठेवली होती. मात्र शहरी पट्टा सुरू होताच पंकज भोयर यांनी आघाडी घेतली ती शेवट पर्यंत कायम राहिली 8 हजार मतांनी आघाडी घेत विजय मिळवला. गत दोन विधानसभा निवडणुकीत जे मताधिक्य मिळाले होते तेवढेच आता मिळवून..त्यांनी सुद्धा हॅटट्रिक साधली आहे.जिल्ह्यातील चारही विधानसभेवर भगवा फडकविण्यात महायुतीला यावेळी यश मिळाले. चारही विधानसभेत विजयी उमेदवारांची भव्य जल्लोषसह फटाकाच्या अतिषबाजीत मिरवणूक काढीत शक्तिप्रदर्शन सुद्धा करण्यात आले. महायुतीच्या कार्यक्र्यामध्ये जलोष, उत्साह पाहावंयास दिसला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button