राजकीयजिल्हा बातम्याराज्य

‘भाजप’ उमेदवाराची ‘हॅट्रीक’ तर ‘कॉंग्रेस’ची सलग चौथी ‘हार’

  1. वर्धा,वर्धा विधानसभा मतदारसंघात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत डॉ. पंकज भोयर यांना तिस-यांना उमेदवारी दिली. तर कॉंग्रेसने या मतदारसंघातून दिवंगत आमदार प्रमोद शेंडे यांचा मुलगा शेखर शेंडे यांना उमेदवारी देत निवडणूक रिंगणात उतरविले. तसेच या मतदार संघातून कॉंग्रेसशी बंडखोरी करून डॉ. सचिन पावडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून राजकीय भवितव्य आजमावले. डॉ. पावडे यांच्या बंडखोरीमुळे या मतदारसंघात तिहेरी लढत होईल असे भाकित वर्तविले जात होते. पण मतमोजणीअंती भाजपच्या डॉ. पंकज भोयर यांना मतदारांनी सलग तिस-यांदा बहुमताचा कौल मिळाला. तर कॉंग्रेसचे उमेदवार शेखर शेंडे यांना चौथ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. निवडणूक प्रचारादरम्यान आमदार डॉ. पंकज भोयर यांनी त्यांनी त्यांच्या एक दशकाच्या कार्यकाळत केलेल्या विविध विकास कामांची माहिती जनसामान्यांना दिली. शिवाय पुढेही मतदारसंघाच्या विकासावर भर देण्याचे मतदारांना आश्वस्त केले होते.वर्धेत विकासाला प्राधान्यक्रम देत मतदान झाल्याचे दिसून आले हे मात्र विशेष.! विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आ. पंकज भोयर यांचा सलग तिस-यांदा झालेला विजय म्हणजे या मतदारसंघात मतदारांनी विकासालाच मतदान केल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
* *लाडकी बहीण योजनेची जादूही चालली..**

मतमोजणीदरम्यान सलग अकराव्या फेरीपर्यंत 589 मतांचे मताधिक्य कायम असलेले कॉंग्रेसचे उमेदवार शेखर शेंडे बाराव्या फेरीत मागे पडले. त्यानंतरच्या काही फे-यांत कधी भाजपचे उमेदवार डॉ. पंकज भोयर तर कधी कॉंग्रेसचे उमेदवार शेखर शेंडे पुढे राहिले. पण मतमोजणीअंती डॉ. पंकज भोयर यांना मतदारांनी बहुमताचा कौल दिल्याचे स्पष्ट झाले. निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने कार्यान्वित केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेही काही प्रमाणात जादूच या निवडणुकीत चालल्याचे मतदार आता उघडपणे बोलत आहेत.

कॉंग्रेसचे उमेदवार शेखर शेंडे यांचा अल्प मतदाने पराभव झाला असला तरी त्यांनी चांगलीच टक्कर भाजपचे उमेदवार आ. पंकज भोयर यांना दिली . शेखर शेंडे यांना निवडणुकीत वडील प्रमोद शेंडे यांचा राजकीय वारसा तसेच सहानभूती ची लाट असताना पण विकास काम तसेच लाडक्या बहीण योजनेमुळे पंकज भोयर यांना विजय प्राप्त झाल्याचे राजकीय जानकरांनी सांगितले. त्यामुळे महिलावर्गसह मतदारांनी आवडत्या उमेदवाराला मतदान करून भोयर यांना विजयी केल्याचेही या निवडणुकीत बघावयास मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button